BJP-Shiv Sena Alliance | विधानसभा निवडणूक 2019: शिवसेना-भाजप युतीची घोषणा 19 सप्टेंबरला होणार? | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीची घोषणा 19 सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. आज साताऱ्यात असलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सध्या तिसऱ्या टप्प्यात आहे आणि यात्रेची सांगता 19 सप्टेंबरला नाशिकमध्ये होणार आहे. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित असतील. त्यांच्या उपस्थितीतच शिवसेना-भाजप युतीची घोषणा होण्याची शक्यता असल्याचं भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी म्हटलं.