मुंबई | अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस, शुभेच्छा देण्यासाठी घराबाहेर चाहत्यांची गर्दी
बॉलिवुडचे अँग्री यंग मॅन, महानायक, सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा आज ७६ वा वाढदिवस. सात हिंदुस्तानी' या चित्रपटातून त्यांनी सुरु केलेला प्रवास आजही तितक्याच उत्साह आणि उमेदीनं सुरु आहे. अभिनय क्षेत्रातल्या त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल अमिताभ बच्चन यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे.