गोवा | अभिनेता प्रतिक बब्बरविरोधात अपघाताचा गुन्हा
बॉलिवूड अभिनेता प्रतिक बब्बरविरोधात गोव्यात काल रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रॅश ड्रायव्हिंगप्रकरणी प्रतिक बब्बरवर गुन्हा दाखल झाला आहे. प्रतिकची अपघातास कारणीभूत असलेली कार पोलिसांनी जप्त केली असून पुढील तपास सुरु आहे. प्रतिक बब्बर हा आपल्या कारने जात असताना उत्तर गोव्यातील पणजी-म्हापसा महामार्गावर एका स्थानिक युवकाच्या दुचाकीशी धडक झाली.