मुंबई : मध्य रेल्वेकडून मुंबईतील 'भेल' लोकल्स सेवेतून बाद
Continues below advertisement
मध्य रेल्वेने मुंबईतील 'भेल' कंपनीच्या लोकल्स आपल्या सेवेतून बाद केल्या आहेत. 'भारत हेवी इलेक्ट्रिकल्स' (BHEL) या इंजिनिअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या काही लोकल मुंबईत धावत होत्या.
12 डब्यांच्या एकूण आठ लोकल्स मध्य रेल्वेवर सुरु होत्या. मात्र आधुनिक बम्बार्डियर लोकल्स आल्यामुळे या जुन्या लोकल्स वापरात न आणण्याचा निर्णय रेल्वेने घेतला. कधी गरज पडली, तरच या लोकल वापरण्यात येतील.
सतत होणारे तांत्रिक बिघाड, पावसाळ्यात बंद पडणाऱ्या लोकल आणि आगीच्या घटनांमुळे हा निर्णय घेण्यात आला. 2 फेब्रुवारीला दादर स्थानकात आग लागलेली लोकलही भेल कंपनीची होती.