मुंबई : खिशातच मोबाईलचा स्फोट, मुंबईत हॉटेलमधील घटना, सुदैवाने गंभीर दुखापत नाही
मोबाईल फोनचा वापर जितका सोयीचा आहे, तितकाच घातकही असल्याचं समोर आलं आहे. मुंबईत एका व्यक्तीच्या खिशात असलेल्या मोबाईल फोनचा अचानक स्फोट झाला. सुदैवाने यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.
मुंबईतील भांडुप स्टेशनजवळ स्टेशन प्लाझामध्ये असलेल्या 'बगिचा हॉटेल'मध्ये सोमवारी दुपारी हा प्रकार घडला. संबंधित व्यक्ती दोन सहकाऱ्यांसोबत जेवायला हॉटेलमध्ये आला होता. त्यावेळी त्याने शर्टच्या खिशात दोन मोबाईल ठेवले होते.