मुंबई : भांडुपमध्ये टँक रोड भागात स्वच्छतागृह खचलं, 4 जण अडकल्याची भीती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Apr 2018 11:33 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईतील भांडुपमध्ये टँक रोड परिसरात असलेल्या पाटीलवाडीतलं अख्खं सार्वजनिक शौचालय खचलं आहे. या शौचालयांची पूर्ण इमारतच जमीनदोस्त झाली आहे. ज्या ठिकाणी ही शौचालयं होती तिथे मोठा खड्डा पडला आहे. आज (सोमवार) सकाळी सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
या शौचालयांच्या ढिगाऱ्याखाली 2 महिला आणि 2 पुरुष अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अनेक तासांपासून हे लोक खचलेल्या शौचालयाखाली अडकल्याची माहिती समजते आहे.
सध्या घटनास्थळी अग्निशमन दल आणि पालिका आपत्ती निवारणाचे जवान पोहोचले आहेत. अडकलेल्या लोकांना सुखरुपपणे बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.