मुंबई : भांडुपमध्ये टँक रोड भागात स्वच्छतागृह खचलं, दोघांचा मृत्यू

Continues below advertisement
मुंबईतील भांडुपमध्ये टँक रोड परिसरात असलेल्या पाटीलवाडीतलं अख्खं सार्वजनिक शौचालय खचलं आहे. यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

या शौचालयांचा पूर्ण ढाचा जमिनदोस्त झाला आहे. ज्या ठिकाणी ही शौचालयं होती तिथे मोठा खड्डा पडला आहे. आज (शनिवार) सकाळी सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या शौचालयांच्या ढिगाऱ्याखाली 2 महिला आणि 2 पुरुष अडकले होते. अनेक तासांपासून हे लोक खचलेल्या शौचालयाखाली अडकले होते. अखेर अग्निशमन दल आणि पालिका आपत्ती निवारणाच्या जवानांनी दोघांचे मतदेह बाहेर काढले आहेत. या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

सध्या घटनास्थळी अग्निशमन दल आणि पालिका आपत्ती निवारणाचे जवान अडकलेल्या लोकांना सुखरुपपणे बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर करत  आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram