मुंबई: बेस्टच्या ताफ्यातून 159 बस कमी होणार

Continues below advertisement
मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टने 159 बस सेवेतून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. साधारण 15 वर्षे आयुर्मान झालेल्या बस सेवेतून बाद केल्या जातात. मात्र यातील अनेक गाड्या एक वर्ष अगोदरचं म्हणजे 14 वर्षाच्या वापरानंतर भंगारात काढण्यात येत आहेत. बेस्ट बस भंगारात काढल्यानं त्यांच्या फेऱ्या कमी होतील परिणामी प्रवाशांनाचा याचा त्रास सहन करावा लागणार आहे. तीन वर्षांपुर्वी बेस्टकडे 4800 बस होत्या आता त्यांची संख्या 3480 वर आली आहे. मात्र बेस्ट आपल्या ताफ्यात बसची संख्या आणखी कमी करुन 3 हजार 337 वर आणायची आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram