मुंबई : भाऊबीजेच्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा एकदिवशीय संप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऐन दिवाळीच्या दिवसात मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. बोनस जाहीर न झाल्यामुळे भाऊबीजेला म्हणजेच शनिवारी 21 ऑक्टोबरला बेस्ट कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा संप पुकारला आहे.
रक्षाबंधनप्रमाणचे भाऊबीजेलाही बेस्ट बसेस रस्त्यावर धावणार नाहीत. त्यामुळे सणासुदीला बहिण-भावांकडे जाताना मुंबईकरांचे हाल होण्याची चिन्हं आहेत.
21 ऑक्टोबरला बेस्टच्या बसेस संपूर्णत: बंद राहणार आहेत. बेस्टचे 32 हजार कर्मचारी संपात सहभागी होणार असल्यामुळे बेस्टच्या 3800 बसपैकी एकही बस रस्त्यावर धावणार नाही. 30 लाख प्रवाशांचे हाल होणार आहेत.