BEST Bus Fare | बेस्ट दरकपात लांबणीवर, बेस्ट समिती सदस्य सुनिल गणाचार्य यांची प्रतिक्रिया | ABP Majha
बेस्ट समितीच्या बैठकीत बेस्ट दर कपातीच्या प्रस्तावाचा निर्णय तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे. यामुळे मुंबईकरांना स्वस्त बेस्ट बस प्रवासासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. आज बेस्ट समितीच्या बैठकीत बेस्ट दर कमी करण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला. परंतु घाईघाईत प्रस्ताव सादर न करता सविस्तर प्रस्ताव बेस्ट समितीत मांडण्यात यावा, अशी मागणी बेस्ट समिती सदस्य सुनिल गणाचार्य यांनी केली. याला सर्व सदस्यांनी पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी पुढील बैठकीत राखून ठेवण्यात आला.