मुंबई : ‘बेस्ट’ची भाडेवाढ, तिकिटांसोबत पासचे दरही वाढणार

Continues below advertisement
मुंबई : ‘बेस्ट’ला आर्थिक सुस्थितीत आणण्यासाठीच्या सुधारणांना महापालिका सभागृहात अंतिम मंजुरी देण्यात आली. यामध्ये बस भाडेवाढीचाही समावेश आहे.

यामुळे आता मुंबईकरांना बस भाडेवाढ सोसावी लागणार आहे. एक एप्रिलापासून भाडेवाढ लागू होणार आहे.

‘अशी’ असेल भाडेवाढ

पहिल्या 4 किलोमीटरपर्यंतच्या भाडे किंमतीत कोणताही बदल नाही. चार किलोमीटरनंतर 1 रु. ते 12 रु. भाडेवाढ सूचवण्यात आली आहे.

म्हणजे -
  • 6 किमीसाठी सध्या भाडे – 14 रु. (प्रस्तावित भाडे – 15 रु.)
  • 8 किमीसाठी सध्या भाडे – 16 रु. (प्रस्तावित भाडे – 18 रु.)
  • 10 किमीसाठी सध्या भाडे – 16 रु. (प्रस्तावित भाडे – 22 रु.)

बस पासच्या किंमतीतही पहिल्या 4 किमीसाठी कोणतेही बदल होणार नाहीत. त्यापुढे 40 रु. ते 350 रु. भाडेवाढ प्रस्तावित आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या पास किंमतीत 4 किमीपर्यंत बदल नाहीत. मात्र त्यापुढे 50 रु. ते 100 रु. वाढ प्रस्तावित आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram