मुंबई : ज्येष्ठ नागरिकांसह अंध-अपंगांना बेस्टमध्ये 50 टक्के सवलत देण्याचा विचार

Continues below advertisement
मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांना बेस्ट बसच्या प्रवासात लवकरच सवलत मिळण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नागरिकांना विनावातानुकुलीत बस भाड्यामध्ये ५० टक्के सवलत देण्याची तयारी करण्यात येत आहे. यासाठी महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीनुसार ही नवी योजना तयार होणार आहे.
ही योजना सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांप्रमाणेच ज्येष्ठ नागरिकांनाही आरएफआडी कार्ड देण्यात येतील. याचप्रमाणं अंध-अपंग नागरिकांसाठी ५० टक्क्याहून अधिक किंवा अगदी मोफत प्रवासाची सुविधाही होऊ शकते अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram