मुंबई : 8 ते 10 जूनपर्यंत मुंबईवर जलप्रलयाचं संकट?
Continues below advertisement
८ ते १० जून दरम्यान मुंबईवर पुन्हा जलप्रलयाचं संकट घोगावणार आहे. 2005 प्रमाणेच मुंबईत या दोन दिवसात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज आयएम़डीनं वर्तवला आहे. 2005 सालात मुंबईत सलग दोन दिवस तुफान पाऊस झाला होता. ज्यात अनेकांचे जीव गेले तर कोट्यवधींचं नुकसानही झालं होतं. त्यामुळे मुंबईकरांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, काल मुंबई आणि उपनगरात पहिला पाऊस झाला. काही काळ झालेल्या या पावसानंच अनेक ठिकाणचे रस्ते तुबंले होते. त्यामुळे नेहमीप्रमाणे मुंबईकरांना याच तुंबलेल्या रस्त्यावरुन मार्ग काढावा लागला.
Continues below advertisement