BDD Chawl | बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाविरोधात हायकोर्टात याचिका | ABP Majha

Continues below advertisement
मुंबई शहरातील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाविरोधातही आता हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याची दखल घेत राज्य सरकार आणि संबंधित प्राधकिरणाने कोणत्या पद्धतीने सदर प्रकल्प आखला आहे. त्याबाबत खुलासा करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. वरळी, एन. एम. जोशी मार्ग, नायगाव आणि शिवडी इथे 206 बीडीडी चाळी असून यासर्व ठिकाणच्या चाळींचा पुनर्विकास प्रक्रिया सुरू आहे.
दक्षिण आणि मध्य मुंबईत 100 वर्षांपूर्वीच्या चाळींची अवस्था सध्या दयनीय आहे. त्यामुळे राज्य सरकरानं आता या चाळींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
मात्र याला विरोध करत शिरीश पटेल आणि सुलक्षणा महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रस्तावित पुनर्विकासामुळे तेथील रहिवाशांचे आरोग्य आणि मुलभूत हक्काचे नुकसान होणार असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram