मुंबई: शमीचं काय होणार?

आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत क्रिकेटर मोहम्मद शमीवर चर्चा होऊ शकते.
मुंबईत सकाळी नऊ वाजता ही बैठक होणार आहे.
आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या नेतृत्वात या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय.
मोहमद शमीचीत पत्नी हसीन हिनं शमीवर गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी तीनं सोशय मीडियावरुन शमीचे अनैतिक संबंध असल्याच्या पोस्टही टाकल्या होत्या. गुन्हा दाखल केल्याची तक्रार त्यांनी बीसीसीआयच्या टीमकडेही सुपूर्द केलीय.
त्याच दरम्यान आज आयपीएलच्या काऊसिलची बैठक होतेय. त्यामुळे यात शमीवर चर्चा होते का हे पाहणं महत्वाचं आहे, मोहम्मद शमी सध्या दिल्ली डेअरडेव्हिल्स टीमकडून खेळतोय. मात्र त्यावर कारवाई झाली तर मात्र त्याला आयपीएलपासून मुकावं लागू शकतं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola