महाराष्ट्र बंद : मुंबई : महाराष्ट्र बंदच्या हाकेनंतर मुंबईकरांची नाकाबंदी, ठिकठिकाणी वाहनांची तोडफोड
Continues below advertisement
कोरेगाव-भीमा परिसरात झालेल्या घटनेच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. शांततेत महाराष्ट्र बंद पाळण्याचं आवाहन करुनही या आंदोलनाला काहीसं हिंसक वळण मिळाल्याचं दिसत आहे. मुंबईत मध्य रेल्वेवर डोंबिवली, कांजुरमार्ग स्थानकावर तोडफोड करण्यात आली.
Continues below advertisement