मुंबई | माहिम, मिनारा मशिदींमध्ये नमाजपठण
आज बकरी ईद, देशभरात ईदनिमित्त मुस्लिम बांधवांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय.. मुंबईतल्या माहिमच्या दर्ग्यामध्ये ईदनिमित्त नमाज पठणासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी पाहायला मिळत आहे... तर, मिनारा मशिदीतही मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केलंय.. रमजान ईदप्रमाणेच मुस्लिम बांधवासाठी बकरी ईद हा प्रमुख सण आहे. इस्लाम धर्माच्या मान्यतेनुसार हज़रत इब्राहिम अल्लाच्या आदेशानुसार आपल्या मुलाची कुर्बानी द्यायला निघाले होते. मात्र हजरत यांचा त्याग पाहून अल्लाहानं बलिदानावेळी एका बोकडास अवतरित केले. तेव्हापासून त्यागाचं प्रतिक म्हणून बकरी ईद साजरी केली जाते.