Vidhan Sabha Election 2019 | बच्चू कडूंसह चार आमदारांचा शिवसेनेला पाठिंबा | ABP Majha

शिवसेनेची विधानसभेतील आमदारांची 60 वर पोहोचली आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले आहेत. तर काल चार अपक्ष आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यांनी शिवसेनेच्या आमदारांची संख्या 60 पोहोचली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाने शिवसेनेला पाठिंबा दिवा आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल मातोश्रीवर भेट घेऊन प्रहार जनशक्तीच्या दोन आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आमदार बच्चू कडू आणि आमदार राजकुमार पटेल यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola