Kisan Long March : मुंबई : रायगडहून शेतकऱ्यांसाठी दीड लाख भाकऱ्या आणि सुकटाची शिदोरी

गेल्या आठ दिवसांपासून 200 किमी अंतर पायी चालत, किसान सभेचा लाँग मार्च आज विधानभवनावर धडकला. नाशिकपासून मुंबईपर्यंत हजारो शेतकरी चालत आले. ना रक्ताळलेल्या पायाची, ना उन वाऱ्याची तमा बाळगता, शेतकरी आपल्या न्याय हक्कांसाठी चालत राहिले.

8 दिवसाची चटणी भाकरी घेऊन हे शेतकरी मुंबईत धडकले. मात्र आज या शेतकऱ्यांना रायगडवरुन जेवण आलं. रायगडचे आमदार जयंत पाटील आणि त्यांच्या शेतकरी कामगार पक्षाने, मोर्चेकरी शेतकऱ्यांना जवळपास दीड लाख भाकरी आणि सुकटचं वाटप केलं.

रायगडवरुन आलेली ही दीडलाख भाकरींची शिदोरी आझाद मैदानावर शेतकऱ्यांना वाटण्यात आली.

तहान भूक हरलेल्या शेतकऱ्यांसाठी या शिदोरीने तोंडाला चव आणल्याचा भाव शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola