Avdhut Tatkare | राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, अवधूत तटकरेंचा शिवसेनेत प्रवेश | मुंबई | ABP Majha

Continues below advertisement
कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केलाय. चार दिवसांपूर्वीच अवधूत तटकरे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. अवधूत तटकरे यांच्यासोबत अनिल तटकरे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तटकडे पिता-पुत्रांच्या हाती शिवबंधन बांधलं. अवधूत तटकरे हे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आहेत. दरम्यान, अवधूत तटकरे हे दुपारी 4 वाजता शिवसेनेत प्रवेश करणार होते. पण, मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे आपल्याला उशीर झाल्याचं तटकरे म्हणाले. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे उद्धव ठाकरेंना 2 तास वेटिंगवर थांबावं लागल्याची चर्चा यावेळी रंगली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram