मुंबई : आमदारांना रिक्षाचालकांच्या मुजोरीचा फटका, रिक्षा-टॅक्सीत टोल फ्री क्रमांक लिहिणं अनिवार्य
Continues below advertisement
रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांच्या मागे लागून रोज तुमचं रक्त आटत असेल. तुमच्या शेजारी पोलिस मामा लोकांना पिळण्यात दंग असतील, पण ते तुम्हाला रिक्षा-टॅक्सी मिळेल याकडे ढुंकूनही बघणार नाहीत. पण तुमच्या-आमच्यासारखाच अनुभव जेव्हा आमदारांना येतो, तेव्हा हा प्रश्न गंभीर होतो आणि त्यावर विधीमंडळात चर्चा होते. त्यावर उपाय काढण्यासाठी मंत्र्यांना धारेवर धरलं जातं.
तीन-तीन आमदारांनी रिक्षा-टॅक्सीवाल्यांच्या मुजोरीमुळे कसा मनस्ताप होतो, याचा पाढा विधीमंडळात वाचला. आपली कैफियत मांडताना राष्ट्रवादी आमदार आनंद ठाकूर, प्रकाश गजभिये, विद्या चव्हाण यांचा संताप अनावर झाला होता.
हे सगळं ऐकून अखेर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी रिक्षा-टॅक्सीवाल्यांच्या तक्रार निवारणासाठी टोल फ्री क्रमांक सुरु करण्याची घोषणा केली. परिवहन विभागातर्फे प्रवाशांना तक्रार करण्यासाठी 1800220110 हा टोल फ्री क्रमांक वाहनात लावणं अनिवार्य केलं जाणार.