ब्रेकफास्ट न्यूज : मुंबईत रिक्षा-टॅक्सीचं भाडं दोन रुपयांनी वाढण्याची शक्यता
Continues below advertisement
रिक्षा-टॅक्सीने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या खिशाला चाप बसण्याची शक्यता आहे. कारण रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यामध्ये दोन रुपयांनी वाढ होण्याची चिन्हं आहेत. मुंबईतील रिक्षा-टॅक्सीच्या दरांबाबत निर्णय घेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाची लवकरच एक बैठक होणार आहे. त्यात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. गेल्या तीन वर्षांपासून ऑटो रिक्षा आणि टॅक्सी युनियन दरवाढीची मागणी करत आहेत. त्यानुसार रिक्षाचं किमान भाडं 18 वरुन 20 रुपयांवर जाईल, तर टॅक्सीचं किमान भाडं 22 वरुन 24 रुपयांवर जाईल.
Continues below advertisement