मुंबई : मुजोर रिक्षा-टॅक्सीवाल्यांचा फटका डीवायएसपी सुजाता पाटलांना, फेसबुकवर संताप व्यक्त

Continues below advertisement
पोलीस आणि रिक्षाचालकांच्या मुजोरीचा अनुभव सामान्यांना नवा नाहीए. पण एका महिला डीवायएसपीलाही त्यांच्या छळाचा, मनस्तापाचा सामना करावा लागला. ही गोष्ट आहे 24 मार्च म्हणजे शनिवारची. आणि त्या अधिकारी होत्या डीवायएसपी सुजाता पाटील. शनिवारी सकाळी 10 वाजता सुजाता पाटील भोपाळवरुन रेल्वेनं मुंबईत आल्या. त्यांचा पाय फ्रॅक्चर होता. मुलगी आजारी. सोबत दोन बॅगा. अंधेरी पश्चिम स्थानकाबाहेर त्यांनी रिक्षावाल्याला इप्सित स्थळी जाण्याची विनंती केली. पण नेहमीप्रमाणे त्यांनी भाडं नाकारलं. हा सगळा प्रकार 100 फूटावर असलेला पोलीस शिपाई निवांत बघत होता. शेवटी त्यांनी मदत मागण्यासाठी डी.एन.नगर पोलीस ठाणं गाठलं. पण स्वत:ची ओळख सांगितली नाही. तिथं त्यांना मदतीऐवजी अपमानास्पद वागणूक मिळाली. अखेर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, पण मदत मिळाली. तशाच अवस्थेत सुजाता पाटील तिथून निघून गेल्या. आणि त्यांनी हा सगळा प्रसंग फेसबुक पोस्ट लिहून कथन केलाय. त्यामुळे महिला सुरक्षा आणि त्यांना मदत वगैरे निव्वळ गावगप्पा असल्याचं समोर आलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram