बॉल टॅम्परिंग प्रकरणी स्मिथ, वॉर्नर, बॅनक्रॉफ्ट दोषी

Continues below advertisement
केपटाऊन कसोटीतल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून चौकशी पूर्ण झाली असून यामध्ये संपूर्ण संघ नाही, तर तीनच खेळाडू यामध्ये दोषी आढळले आहेत. या प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलँड यांनी ऑस्ट्रेलियन नागरिकांची जाहीर माफी मागितली.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरुन बॅनक्रॉफ्ट हे तिघे बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळले आहेत. तर डॅरेन लिमन यांना या षडयंत्राची कल्पना नसल्याचं आढळल्यामुळे ते प्रशिक्षकपदी कायम राहणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram