Mumbai ATS | मुंबई एटीएसकडून बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्सचेंज कॉल सेंटरचा पर्दाफाश | ABP Majha

Continues below advertisement
मुंबई दहशतवाद विरोधी पथकाकडून एका बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्सचेंज कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कॉल सेंटरचा दहशतवादी संघटनाशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. मुंबईत एटीएसने एकूण सहा ठिकाणी धाडी टाकल्या असून 7 जणांना अटक केली आहे. तर साडे सहा लाखांचा माल जप्त केला आहे. या रॅकेटमधून घातपाती कृत्य होण्यासाठी संपर्क केल्याची सूत्रांची माहिती एटीएसला मिळाली होती. तसेच या रॅकेटच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय कॉल करून ते इतर राज्यात वळवण्यात येत होते. त्यामुळे अतिरेकी कारवायांसाठी या टेलिफोन एक्सचेंज रॅकेटचा वापर केला जात तर नाही ना? याचा तपास सध्या एटीएस करत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram