मुंबई : आरे कॉलनीत मृत्यू झालेल्या अथर्व शिंदेच्या मृत्यूचा तपास गुन्हे शाखेकडे
गोरेगावमधील आरे कॉलनीत तलावाशेजारी मृतावस्थेत सापडलेल्या अथर्व शिंदेच्या मृत्यूचा तपास आता क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला आहे. बर्थडे पार्टीमध्ये अथर्वचं रॅगिंग करुन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा संशय वडिलांनी पत्राद्वारे व्यक्त केला आहे.