मुंबई : माझ्या मुलीच्या मारेकऱ्यांना 10 वेळा फाशी द्या, अश्विनी बिद्रेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या करणाऱ्याला एकदा नाही, तर १० वेळा फाशी द्या, अशी मागणी अश्विनींचे वडील जयकुमार बिद्रेंनी केली आहे. तिची हत्या अत्यंत क्रुर आणि निर्दयीपणे करणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, आणि या केसमध्ये उज्वल निकम यांची नियुक्ती करावी असंही त्यांनी म्हटलं आहे.