मुंबई : मेट्रोमुळे ध्वनी प्रदूषण होतं, मग IPL चा दणदणाट कसा चालतो? : अश्विनी भिडे
Continues below advertisement
मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या ध्वनीप्रदुषणावरुन उच्च न्यायालयात जाणारे, आयपीएलच्या मॅचदरम्यान होणाऱ्या प्रदुषणाबाबत गप्पा का? असं ट्विट केलंय मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी. मुंबईच्या वानखेडे, ब्रेब़ॉर्न स्टेडियमवर आयपीएलचे सामने होतात.. तेव्हा आवाजाच्या कोणत्याही मर्यादा पाळल्या जात नाहीत. मग लोक इतके पक्षपाती का वागतात हे कळत नाही असं अश्विनी म्हणतायत. मेट्रोच्या कामांमुळे ध्वनीप्रदुषण होत असल्याची आणि स्थानिकांना त्रास होत असल्याच्या याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्यायत... मात्र क्रिकेटचा मुद्दा आला की हेच लोक भूमिगत होतात असा टोलाही त्यांनी लगावलाय,. मात्र अश्विनी भिडेंच्या याच ट्विटचा राग याचिकाकर्त्यांना आलाय. आणि त्यांनी उच्च न्यायालयात तक्रार केलीय. यात मुंबई मेट्रोच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याकडून कोर्टाची टिंगल होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
Continues below advertisement