मुंबई : एकनाथ खडसेंचं काँग्रेसमध्ये स्वागतच : अशोक चव्हाण

Continues below advertisement
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना काँग्रेसमधून यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडूनच ऑफर देण्यात आली आहे. एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये आले तर त्यांचं स्वागत करु, असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं आहे.

यापूर्वी हिवाळी अधिवेशनात काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी एकनाथ खडसेंना पक्षात येण्याची ऑफर दिली होती. मात्र 40 वर्षे पक्ष उभा करण्यासाठी घालवले, आता पक्ष कसा सोडू शकतो, असं म्हणत त्यावेळी खडसेंनी यशोमती ठाकूर यांच्या ऑफरला उत्तर दिलं होतं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram