मुंबई : अॅप्रेंटिसचा रेलरोको : आंदोलक विद्यार्थ्यांची वेगळी परीक्षा घेणार : सूत्र
Continues below advertisement
रेल्वेभरतीतील गोंधळाविरोधात अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत, मध्य रेल्वे ठप्प केली आहे. पिक अवर्सलाच म्हणजे सकाळी कामावर जाण्याच्या वेळेलाच, अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी अचानक रेल्वे बंद केल्याने, मुंबईकरांचं तुफान हाल होत आहे.
विद्यार्थ्यांनी माटुंगा ते दादर दरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडला आहे. त्यामुळे लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या एक्स्प्रेसही रखडल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर रेल्वेला जाग आली आहे. अॅप्रेंटिसशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नव्याने परीक्षा घेणार असल्याचं सांगितलं आहे. मध्य रेल्वेनं यासंदर्भात एक प्रसिद्धी पत्रकही काढलं आहे. या पत्रानुसार विद्यार्थ्यांना 20 टक्के जागा राखीव ठेवल्या जाणार आहे. या विद्यार्थ्यासाठी परीक्षा घेतली जाईल, त्यासाठी 31 मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.