मुंबई : अॅप्रेंटिसचा रेलरोको : आंदोलन मागे घेतल्यावर प्रशिक्षणार्थ्यांशी बातचीत

Continues below advertisement
तब्बल साडेतीन तासानंतर रेल्वे प्रशिक्षणार्थींनी रेलरोको आंदोलन मागे घेतलंय. 20 टक्के जीएम कोटा रद्द करण्याची मागणी प्रशिक्षणार्थींनी केली होती. त्याऐवजी या प्रशिक्षणार्थींसाठी वेगळी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यासाठी अर्ज भरण्याची मुदत 31 मार्च करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानंतर आंदोलक ट्रॅकवरुन बाजूला झाले, आणि दोन्ही बाजूंची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. दरम्यान त्याआधी तीन ते साडेतीन तास मध्य रेल्वे खोळंबल्यानं चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेकांना आपलं कार्यालय गाठता आलं नाही. विशेषत: वृद्धांचे प्रवास करताना चांगलेच हाल झाले. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram