मुंबई : अॅप्रेंटिसचा रेलरोको : आंदोलक मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटले

Continues below advertisement
मनसेचं शिष्टमंडळ उद्या (21 मार्च) दिल्लीत जाऊन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार आहेत. या शिष्टमंडळात बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, मनोज चव्हाण यांचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थी मुलांचं शिष्टमंडळही सोबत असणार आहे.

आज राज ठाकरे यांनी रेल्वेतल्या प्रशिक्षणार्थींची भेट घेतली. त्यावेळी राज यांनी प्रशिक्षणार्थींना भरती प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं. साडेतीन तास आंदोलन केल्यानंतर रेल्वतील परीक्षार्थींनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. एमआयजी क्लबजवळ आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होती. त्याआधी आंदोलकांनी राज ठाकरेंसोबत चर्चा केली.

आंदोलकांसोबत रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी मनसेचे पदाधिकारी येतील आणि तुमच्या मागण्या मान्य करुन घेऊ, असं आश्वासन यावेळी राज ठाकरेंनी आंदोलकांना दिलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram