मुंबई : अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या फाईल्स सुरक्षित : सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे

Continues below advertisement
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कार्यालयातून फाईल चोरी प्रकरणी महामंडळाचे महाव्यवस्थापक दत्तात्रय झोंबाडे यांना निलंबित करण्यात आले आहे. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली.

इतकंच नाही तर चोरी करणारे चोरटे हे अटकेत असलेले राष्ट्रवादीचे निलंबित आमदार रमेश कदम यांचा भाऊ आणि त्याचे साथीदार असल्याचे समोर आले आहे.

या कार्यालयात चोरी झाली असली, तरी रमेश कदम यांच्या खटल्यावर परिणाम होणार नाही. कारण रमेश कदम यांच्यावर सीआडीने कारवाई करताना, महत्वाची कागदपत्रे आधीच ताब्यात घेतली आहेत, असं दिलीप कांबळे यांनी सांगितलं.

आज संध्याकाळी दिलीप कांबळे घटनास्थळी भेट देणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram