अंधेरीत 22 मजली इमारतीला आग, दोघांचा मृत्यू | मुंबई | एबीपी माझा
मुंबईतल्या अंधेरीच्या वीरा देसाई रोडवरील ((22 मजली)) इमारतीच्या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला. कदम नगरमधील एसआरएच्या 22 मजली इमारतीच्या 10व्या आणि 11व्या मजल्यावर ही आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी 10 आणि 11 व्या मजल्यांवर अडकलेल्या 5 जणांना बाहेर काढलं. मात्र धुरामुळे गुदमरल्याने तिघांची प्रकृती गंभीर बनली होती. त्यांना उपचारासाठी कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यातील दोघांचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला.