मुंबई : अंधेरी पूल दुर्घटना : लोकलसेवा सुरक्षित नाही तर बुलेट ट्रेन काय कामाची
Continues below advertisement
मुंबईकरांचा जीव किती स्वस्त आहे, याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आलाय. कारण अंधेरी स्टेशनवरुन पार्ल्याला जोडणारा गोखले पादचारी पुलाचा भाग सकाळी साडेसातच्या दरम्यान कोसळला. ज्यात 4 जण जखमी आहेत. यानंतर मुंबईतील फूट ओव्हर ब्रीज, जिने आणि इतर सुविधा अद्ययावत करण्यावर भर देऊ असं आश्वासन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिलं होतं. मात्र बोलबच्चनगिरीशिवाय मुंबईकरांच्या हाताला काहीही लागलेलं नाही. आम्हाला बुलेट ट्रेनची गरज नाही, आधी आहे ती लोकलसेवा सुरक्षित करा अशाप्रकारच्या प्रतिक्रिया सर्वसामांन्यातून येत आहे.
Continues below advertisement