मुंबई : अंधेरी पूल दुर्घटना : पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
अंधेरी स्टेशनवर विलेपार्ले एंडच्या बाजूने पुलाचा फुटपाथ कोसळल्यामुळे रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. दोन्ही दिशेची वाहतूक सध्या ठप्प आहे. अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा हा गोखले ब्रिज आहे. पुलाच्या बाजूचा फुटपाथ कोसळला आहे.
फलाट क्रमांक 8 आणि 9 यांच्यामधील हा ब्रिज होता. तो कोसळला. हा पूल खूपच जीर्ण झाला होता, त्याला लोखंडाचा सपोर्ट दिला होता. मात्र आज सकाळी साडेसातच्या सुमारास तोही कोसळला. ब्रिज आणि लोखंडाचा सपोर्ट ओव्हरहेड वायरवर कोसळल्यामुळे ओव्हरहेड वायर तुटल्या. ब्रिज कोसळल्याने मोठ्या प्रमाणात ढिगारा साचला आहे. पावसामुळे हा ढिगारा काढणं मोठं जिकीरीचं काम आहे.