EXCLUSIVE : हवाईजादा कॅप्टन अमोल यादव यांच्याशी खास बातचित
Continues below advertisement
भारतीय बनावटीचं पहिलं सहा आसनी विमान बनवणाऱे कॅप्टन अमोल यादव यांच्यावर पुढील विमानही घराच्या गच्चीतच बनवायची वेळ आलेली आहे. कारण सरकारनं त्यांच्या प्रकल्पासाठी आश्वासित केलेली 150 एकरची जमीन अजूनही लालफितीच्या कारभारात अडकली आहे. कॅप्टन अमोल यादव यांनी बनवलेल्या टीएसी-003 या सहा आसनी विमानाचं सगळीकडे कौतुक झालं होतं. त्यामुळे राज्य सरकारनंही मेक इन इंडिया अंतर्गत त्यांच्या प्रकल्पाला प्रोत्साहन म्हणून पालघर जवळ 150 एकर जमीन देण्याची तयारी दाखविली होती. परंतु राज्य सरकारनं सहकार्य करूनही डीजीसीएच्या चुकीच्या धोरणांमुळे आपल्याला ही जमीन अद्यापही ताब्यात मिळालेली नाही असं कॅप्टन अमोल यादव यांनी सांगितलं.
Continues below advertisement