मुंबई: मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसाद कांबळी, अमोल कोल्हेंवर मात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Apr 2018 08:40 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत प्रसाद कांबळी यांनी बाजी मारली. मोहन जोशी पॅनेलचे डॉ. अमोल कोल्हे आणि प्रसाद कांबळी यांच्यात मुख्य लढत होती ज्यामध्ये प्रसाद कांबळींनी विजय मिळवला. 2018 ते 2023 या पाच वर्षांसाठी परिषदेच्या अध्यक्षपदाचा कारभार आता प्रसाद कांबळी यांच्याकडे असेल. प्रसाद कांबळीसह शरद पोंक्षे यांची प्रमुख कार्यवाहकपदी तर नाथा चितळे यांची कोशाध्यक्षपदी निवड झाली.