मुंबई : सीएसएमटी स्टेशन एखाद्या राजवाड्यासारखं : अमिताभ बच्चन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महानायक अमिताभ बच्चन यांनी रविवारी छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनला भेट दिली. यावेळी मध्य रेल्वेने प्रवासी जनजागृततीसाठी व्हिडीओ देखील शूट केले. ''एक सफर रेल के साथ'' या मोहिमेचा अमिताभ बच्चन हे भाग आहेत. त्यानिमित्तच त्यांनी स्टेशनला भेट दिली. यासंदर्भात त्यांनी स्वतःच्या ब्लॉगवर फोटो शेयर केले आणि सीएसएमटी स्टेशनची खुप स्तुती केली आहे. सीएसटी हे एखाद्या पॅलेससारखं वाटलं अशी प्रतिक्रिया त्यांनी ब्लॉगमध्ये दिली आहे.