मुंबई : एक कोटी गुंतवले, 114 कोटी मिळवले, बिग बी मालामाल
Continues below advertisement
महानायक अमिताभ बच्चनने 2015 मध्ये मुलगा अभिषेक बरोबर आपल्या खासगी गुंतवणुकीतून सिंगापूरच्या मेरिडिअन टेक पीटीई कंपनीत 1 कोटी 60 लाख रूपये गुंतवले.
व्यंकट श्रीनिवास मीनावल्ली यांच्या मालकीच्या या कंपनीबद्दल फारशी माहितीही नव्हती. पण मेरिडिअनची उप कंपनी असलेली जिद्दू डॉट कॉम ही कंपनी लाँगफिन कॉर्पने विकत घेतली. ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार, या व्यवहारानंतर मेरिडिअन टेकमध्ये अमिताभ आणि अभिषेकला लाँगफिन कॉर्पचे तब्बल 25 लाख शेअर्स मिळाले.
सोमवारी नेसडॅक या अमेरीकन शेअरबाजारात लाँगफिनच्या एका शेअरची किंमत 70 डॉलर होती. म्हणजेच 2015 साली 1 कोटी 60 लाख रुपये गुंतवले आणि 2017 मध्ये अमिताभ यांना परतावा मिळाला.. तब्बल 114 कोटी... म्हणजेच गुंतवणुकीचा परतावा मिळाला... जवळपास 75 पट.