मुंबई: इस्रायल पंतप्रधानांचा बॉलिवूड कलाकारांसोबत सेल्फी
इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्य़ाहू मुंबई दौऱ्यातील शेवटच्या टप्प्यात शलोम या बॉलिवूडच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर सहभागी झाले होते. यावेळी नेतन्याहू यांनी बॉलिवूडच्या सिताऱ्यांसोबत सेल्फीही काढला. या कार्यक्रमावेळी अभिनेत्री ऐश्वर्या राय, अभिनेता अभिषेक बच्चन, दिग्दर्शक सुभाष घई, करण जोहर, अनुराग कश्यप, इम्तीयाज़ अली, गीतकार प्रसून जोशी आणि गायक शंकर महादेवन यांच्यासह अनेकजण सहभागी झाले होते.