मुंबई : अमित ठाकरेंचा मिताली बोरुडेसोबत आज साखरपुडा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. राज यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा आज साखरपुडा होणार आहे. अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेचा उद्या साखपुडा आहे. कृष्णकुंज या निवासस्थानावर घरगुती पद्धतीनं हा साखरपुडा होईल. मिताली फॅशन डिझायनर असल्याची माहिती आहे, तर अमित ठाकरेही तसे राजकारणापासून अलिप्त राहिले आहेत. अमित आणि मिताली यांची जुनी ओळख आहे. याच ओळखीचं रुपांतर प्रेमात आणि आता लवकरच विवाहबंधनात होणार आहे.विशेष म्हणजे, उद्या राज ठाकरेंच्या लग्नाचा वाढदिवसही आहे. त्यामुळे याच मुहूर्तावर दोघांचा साखरपुडा केला जाणार आहे. या सोहळ्याला कोण-कोण उपस्थित राहणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.