मुंबई : युतीचा निर्णय पक्ष घेईल, स्वबळाच्या तयारीला लागा, अमित शाहांचे कार्यकर्त्यांना आदेश

Continues below advertisement
युतीचा निर्णय पक्ष घेईल, तुम्ही स्वबळाच्या तयारीला लागा, असे आदेश भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. शाह आज एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र आणि गोव्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शाहांना स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांच्या कामांचा आढावा घेतला. भाषण करण्याऐवजी त्यांनी पदाधिकाऱ्यांशी वन टू वन संवाद साधण्यावरच भर दिला. तसंच पक्षाच्या विस्तारकांवर बूथ रचनेची प्रमुख जबाबदारी असून 'एक बूथ २५ युथ' यानुसार नेमणुका करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर शाह यांनी प्रत्येक बूथ प्रमुखाला २३ सूत्री कानमंत्रही दिला. दरम्यान, शाह यांचे पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे आदेश आगामी निवडणुकीतील युतीचं चित्र स्पष्ट करणारा आहे, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram