VIDEO | #MeToo : दिग्दर्शक राजकुमार हिरानींवर लैंगिक शोषणाचे आरोप | एबीपी माझा
Continues below advertisement
बॉलिवूडमध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ताने सुरु केलेल्या #Metoo वादळाच्या तडाख्यात आता प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी सापडले आहेत. मुन्नाभाई एमबीबीएस, 3 इडियट्स, पीके आणि संजूसारख्या सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी मार्च ते सप्टेंबर 2018 या कालावधीत लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. हे आरोप एका मेलद्वारे करण्यात आले असून संबंधित महिलेने हिरानी यांच्याबरोबरच दिग्दर्शक, निर्माते विधू विनोद चोप्रा यांनाही हा मेल पाठवला आहे.
Continues below advertisement