VIDEO | बेस्टला पाठिंब्यासाठी महापालिका कर्मचारी उद्यापासून संपावर | मुंबई | एबीपी माझा
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आज चौथ्या दिवशीही सुरुच आहे..मात्र दिवसेंदिवस या संपाची व्याप्ती वाढते आहे.. कारण तोडगा नाही निघाला तर उद्यापासून मुंबई महापालिकेचे हजारो कर्मचारी संपावर जात बेस्ट कर्मचाऱ्यांना पाठिंबा देणार आहेत. ज्यात सफाई कर्मचारी, मलनिस्सारण, आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. त्यामुळे हळूहळू बेस्टचा संप हा मुंबई ठप्प करण्याच्या दिशेनं होतोय. शिवाय आजपासून बेस्टच्या वीज पुरवठ्याचे 6 हजार कर्मचारीही संपावर गेले आहेत. द इलेक्ट्रिकल युनियनने संपाला पाठिंबा दिला आहे. काल बेस्ट कर्मचारी संघटनांची शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली..परंतु या बैठकीत मागण्यांबाबत कोणताही तोडगा निघाला नाही.. बेस्टचं बजेट मनपाच्या बजेटमध्ये विलीन करायला महापालिकेनं असमर्थता दर्शवलीय.