मुंबई : आकाश अंबानीच्या साखरपुड्याअगोदर जंगी पार्टीचं आयोजन
Continues below advertisement
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश याचं लग्न हिरे व्यापारी रसेल मेहता यांची कन्या श्लोका हीच्याशी ठरलंय. याच निमित्ताने अंबानींच्या घरी जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं. शाहरुख आणि करण जोहर सोबत बॉलिवूडच्या बड्या कलाकारांची या पार्टीला हजेरी होती. आकाश अंबानी आणि श्लोका या दोघांचं प्री-एंगेजमेंट शूट गोव्यात पार पडलं. त्यांनंतर सिद्धिविनायक मंदीरात जात आकाश आणि श्लोकाने बाप्पाचे आशीर्वादही घेतले. या वर्षीच्या जून महिन्यात या दोघांचा साखरपुडा होणार असून वर्षाच्या शेवटी लग्न होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. लग्नाचे विविध कार्यक्रम तीन ते चार दिवस मुंबईच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये चालण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement