मुंबई | अजित वाडेकरांना मुंबई क्रिकेट असोसिएशनची आदरांजली
भारताच्या कसोटी संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आज एका शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. वानखेडे स्टेडियमच्या लाऊंजमध्ये आयोजित या शोकसभेला मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मुंबईचे आजी-माजी दिग्गज खेळाडू उपस्थित होते. वाडेकर यांच्या कुटुंबियांनीही या शोकसभेला उपस्थिती राखली होती.