Air India | एअर इंडियाची इमारत राज्य सरकार खरेदी करणार | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

Continues below advertisement
मुंबईतील नरिमन पॉईंट येथील एअर इंडियाची 23 मजली इमारत राज्य सरकार खरेदी करणार आहे. त्यासाठी 1400 कोटी रुपयांची बोली राज्य सरकारच्या वतीने लावण्यात आली आहे. एलआयसी आणि जेएनपीटीपेक्षा जास्त बोली लावल्याने राज्य सरकारला या इमारतीचा ताबा मिळणार आहे. एअर इंडियाची इमारत खरेदी करण्यासाठी जेएनपीटीने 1375 कोटी आणि एलआयसीने 1200 कोटी रुपयांची बोली लावली होती. राज्य सरकारने त्यांच्यापेक्षा अधिक बोली लावली आहे. महाराष्ट्राच्या प्रशासनाचे सर्व विभाग एकाच इमारतीत आणण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. सर्व कार्यालयं या एकाच इमारतीत हलवली तर कारभारात अधिक पारदर्शकता येईल, तसेच कारभार अधिक गतिमान होईल असे राज्य सरकारला वाटते, त्यामुळेच हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram