मुंबई : अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर, न्यूयॉर्कमध्ये उपचार
Continues below advertisement
बॉलिवूड कलाकारांची दुर्धर आजारांची मालिका वाढत आहे. अभिनेता इरफान खाननंतर आता सोनाली बेंद्रेचं नाव या यादीत आलं आहे. सोनाली बेंद्रेला हाय ग्रेड कॅन्सर झाला आहे. स्वत: सोनाली बेंद्रेने त्याबाबतची माहिती ट्विटरवर दिली आहे. सध्या ती अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे.
हायग्रेड कॅन्सरचा साधा अर्थ म्हणजे वेगानं पसरणारा कॅन्सर. सोनालीनं स्वत: भावनिक पत्र लिहून ही धक्कादायक माहिती दिली आहे. मी आशादायी असून कॅन्सरच्या प्रत्येक स्टेजला सामोरं जाऊन लढण्यास तयार असल्याचं सोनालीनं तिच्या पत्रात म्हटलं आहे.
सोनाली बेंद्रेने ट्विटरवर पत्रक प्रसिद्ध करत, कॅन्सरचं निदान झाल्याचं म्हटलं आहे.
Continues below advertisement