Rinku Rajguru | 'इंग्लिशमध्ये सांगू काय' म्हणणाऱ्या 'आर्ची'ला बारावीत 82 टक्के गुण | ABP Majha
Continues below advertisement
पुणे बोर्डाचा बारावी परीक्षेचा निकाल आज घोषित करण्यात आला. या परीक्षेत सैराटच्या आर्चीला अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरूला 650 पैकी 533 गुण मिळाले आहेत. मराठीत सांगितलेलं कळत नाही का? इंलिशमध्ये सांगू काय असं म्हणणाऱ्या आर्चीला बारावी परीक्षेत इंग्रजी विषयात कमी म्हणजे 54 मार्क मिळाले आहेत. रिंकू राजगुरूला मराठीत 86, भूगोल विषयात तब्बल 98, इतिहास विषयात 86, राज्यशास्त्र विषयात 83, अर्थशास्त्र विषयात 77 तर पर्यावरण स्टडी विषयात 49 गुण मिळाले आहेत. तिला एकूण सात विषयात 650 पैकी 533 गुण मिळाले आहेत. तिला सरासरी 82 टक्के मार्क मिळाले आहेत.
Continues below advertisement